नखं सांगतात आरोग्याबद्दल बरंच काही, ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष!
आपली नखे आपल्या आरोग्याबद्दल बर्याच गोष्टी सांगतात, हे बहुतेक लोकांना माहितच नसते. पांढर्या रंगाची नखे, हलक्या गुलाबी रंगाची नखे, अर्धवट तुटलेली नखे आपल्या शरीरातील अनेक रोगांची सुरुवात होत असल्याचे सांगत असतात.
1 / 7
आपली नखे आपल्या आरोग्याबद्दल बर्याच गोष्टी सांगतात, हे बहुतेक लोकांना माहितच नसते. पांढर्या रंगाची नखे, हलक्या गुलाबी रंगाची नखे, अर्धवट तुटलेली नखे आपल्या शरीरातील अनेक रोगांची सुरुवात होत असल्याचे सांगत असतात. यात यकृत, फुफ्फुस आणि हृदय यासारख्या आजारांचा समावेश आहे. चला तर, जाणून घेऊया अशी कुठली लक्षणे आहेत.
2 / 7
प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता असल्यासही बर्याच वेळा नखे तुटण्याची समस्या उद्भवते. जर आपल्याला ही समस्या वेळेत समजली नाही तर हाडे, स्नायू आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्यांचा धोका असतो
3 / 7
आपले नखे कधी कधी आपोआप तुटू लागतात. हे लक्षण थायरॉईड समस्येशी संबंधित असू शकते. त्याच वेळी, कुरतडलेल्या आणि तुटलेल्या नखांवर पिवळसरपणा असेल तर हे फंगल इन्फेक्शनचे लक्षण आहे.
4 / 7
खूप फिकट गुलाबी नखे कधीकधी गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. जसे की, अशक्तपणा, कंजेस्टिव हार्ट फेल्युअर, यकृताच्या समस्या, कुपोषण या आजारांमुले नखे फिकट गुलाबी दिसू शकतात.
5 / 7
बहुतेक स्त्रियांमध्ये अशक्तपणा अर्थात अॅनेमियाची समस्या आढळते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास ही समस्या निर्माण होते. अशक्तपणा दरम्यान बर्याच वेळा नखे कमकुवत होतात आणि ती मोडतात.
6 / 7
जर आपले नखे पूर्णपणे पांढऱ्या रंगाची असतील तर, ते यकृता संबधी समस्या दर्शवतात. हिपॅटायटीस या आजारात आपल्या हाताची बोटं देखील पिवळी पडतात. हेसुद्धा यकृत समस्येचेच आणखी एक लक्षण आहे.
7 / 7
आपल्या नखांवर गडद रेषा दिसत असल्यास आपण लवकरच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. हे कधीकधी मेलेनोमामुळे उद्भवते, हा एक त्वचेचा धोकादायक कर्करोग आहे.