बाॅलिवूडचे दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. राज कपूर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील केल्या आहेत.
राज कपूर यांचा बाॅलिवूडचा प्रवास हा म्हणावा तेवढा नक्कीच सोपा नव्हता. सुरूवातीच्या काळात राज कपूर हे वडिलांच्या स्टूडिओमध्ये झाडू मारायचे काम करायचे.
पृथ्वीराज कपूर यांचा राज कपूर यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. पृथ्वीराज कपूर यांना नेहमीच वाटायचे की, राज कपूर हे फार काही करू शकणार नाहीत.
यामुळेच पृथ्वीराज कपूर यांनी राज यांच्यावर सहायक क्लॅपर ब्वॉयचे काम दिले होते. केदार शर्मा यांनी त्यांच्या चित्रपटात सर्वात अगोदर राज कपूर यांना काम दिले.
चित्रपट क्षेत्रामध्ये नाव तयार करण्यासाठी राज कपूर यांनी आपल्या वडिलांच्या स्टूडिओमध्ये झाडू मारण्याचे काम करावे लागले. दर महिन्याला यासाठी 1 रूपया राज कपूर यांना मिळायचा.