तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकार तगडी फिस घेतात.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत जेठालालचे पात्र साकारण्यासाठी दिलीप जोशी एका एपिसोडसाठी तब्बल 1.5 लाख रूपये फिस घेतात.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अय्यरची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्दे हा एका एपिसोडसाठी 80 हजार रूपये फिस घेतो.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात मुनमुन दत्ता ही 50 हजार रूपये फिस घेते.
पत्रकार पोपटलाल याच्या भूमिकेसाठी श्याम पाठक एका एपिसोडसाठी 60 हजार रूपये फिस घेतो. बापूजी अर्थात अमित भट्ट एका एपिसोडसाठी 70 हजार फिस घेतो.
सोनालिका जोशी अर्थात भिडेची पत्नी माधवी ही तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एका एपिसोडसाठी 35 हजार रूपये फिस घेते.