Travel | हनिमूनसाठी फिरायला जाताय? बेस्ट पर्याय शोधताय मग या खास ठिकाणांचा नक्की विचार करा!
नुकताच लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. तुमच्या पैकी बरेच जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जाण्याचा विचार करत असेल. तर हे तुमच्यासाठी काही सर्वोत्तम पर्याय.
1 / 6
सध्या लग्नाचा सिजन सुरू आहे. लग्नानंतर सर्वांना वेध लागताता ते हनिमूनचे. एकमेकांसोबत काही खास क्षण देण्यासाठी प्रत्येकजण हनीमुनला जातो. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही कोणत्या ठिकाणी फिरायला जावू शकता.
2 / 6
केरळमधील प्रसिद्ध हिल स्टेशनच्या वायनाडचा तुम्ही विचार करु शकता. हे दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.येथील हवामानाशिवाय लेणी, मंदिरं तुम्ही पाहू शकता.
3 / 6
डलहौसी हे हिमाचल प्रदेशातील एक छोटेसे शहर आहे. येथील शांती तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. तिथल्या निसर्गसौंदर्याने, फुलांनी, कुरणांनी, वेगाने वाहणाऱ्या नद्यामद्ये तुम्ही हरवून जालं.
4 / 6
अंदमान हा समुद्राच्या मध्यभागी स्थित एक द्वीपसमूह आहे. अनेक लहान बेटांनी आणि अनेक पर्यटन स्थळांनी वेढलेले, अंदमान हे सर्वात आवडते हनीमून आणि हॉलिडे डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये तुमच्या जोडीदारासोबत फिरू शकता. जर तुम्हाला मालदीवला जाण्याची ईच्छा असेल पण बजेटमुळे जाता येत नसेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.
5 / 6
श्रीनगर हे जोडप्यांसाठी नेहमीच आवडते ठिकाण आहे. जर तुम्ही श्रीनगरला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण जगू शकता. येथील दल सरोवरावर तुम्ही जास्त मजा करू शकता. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जायच असेल तर तुम्ही येथे नक्की जावू शकता.
6 / 6
'माउंट अबू' च्या निसर्गरम्य ठिकाणांमध्ये तुम्ही रममाण होऊ शकता. राजस्थानमध्ये 'माउंट अबू' हे एकमेव 'हिल स्टेशन' आहे.'माउंट अबू' हे पश्चिम भारतातील राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे.