Marathi News Photo gallery Know unknown Facts About Octopus And its 9 Brain and 3 heart story Check Here All details know more
sea | अथांग समुद्रात दडलंय एक सहस्य, 9 मेंदू, 3 हृदय असणाऱ्या या विचित्र प्राण्याला तुम्ही ओळखता का ?
जेव्हा जेव्हा समुद्रातील प्राण्यांची चर्चा होते, तेव्हा मासे सोडून ऑक्टोपस या प्राण्याची चर्चा नक्कीच होते. दिसायला विचित्र दिसणारा हा प्राणी तरीही खूप खास आहे.
1 / 6
जेव्हा जेव्हा समुद्रातील प्राण्यांची चर्चा होते, तेव्हा मासे सोडून ऑक्टोपस या प्राण्याची चर्चा नक्कीच होते. दिसायला विचित्र दिसणारा हा प्राणी तरीही खूप खास आहे. या प्राण्यामध्ये असे अनेक रहस्य आहेत, ज्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती सहस्य.
2 / 6
फोटो दिसणाऱ्या भुजा पाहून ते ऑक्टोपस पाय आहेत असे अनेकांना वाटते, पण ते तसे नसून ते ऑक्टोपसचे हात आहेत. म्हणूनच त्याला मराठी मध्ये अष्टभूज म्हणतात. त्याच्या प्रत्येक हातामध्ये मेंदू आहे, म्हणून त्याला 9 मेंदू आहेत.
3 / 6
म्हणजेच त्याचा एक मुख्य मेंदू आणि नंतर आठ हातांमध्ये आणखी आठ मेंदू असतात. एवढेच नाही तर ऑक्टोपसला श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन हृदये असतात. यासोबतच याच्या रक्ताचा रंगही निळा आहे, त्यामुळे हा जीव इतर जीवांपेक्षा खूप वेगळा आहे.
4 / 6
शस्त्रात या प्राण्याला खूप उपयोग होतो आणि ऑक्टोपस कोणत्याही प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी ते सर्व बाजूंनी लक्ष ठेवते. पण, ऑक्टोपसला मनाप्रमाणे वातावरण मिळाले नाही, तर त्याला कंटाळा येऊ लागतो आणि मग तो स्वतःच्याच हातांना चावायला लागतो.
5 / 6
तो समुद्रात कोठेही राहू शकतो .समुद्रात तो त्याचे घर सतत बदलत असतो काही बाटली आहे, पेटी आहे की दगडांमध्ये थोडी जागा आहे. म्हणजेच जगण्यासाठी कुठला तरी कोपरा हवा असतो.
6 / 6
ऑक्टोपस स्वतःमध्ये खूप खास प्राणी आहे परंतु तो जास्त काळ जगत नाही. त्याच्या अनेक प्रजाती 6 महिन्यांच्या मृत होतात.