Photo ! ‘तेजस्वी’ बिहार! कोण आहेत लालूपुत्र तेजस्वी यादव?
बिहारचे राजकारण कोळून प्यायलेल्या नितीशकुमार यांच्याशी कडवी झुंज दिल्याने राजद नेते तेजस्वी यादव राष्ट्रीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. (facts about tejashwi yadav)
1 / 8
बिहारचे राजकारण कोळून प्यायलेल्या नितीशकुमार यांच्याशी कडवी झुंज दिल्याने राजद नेते तेजस्वी यादव राष्ट्रीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
2 / 8
तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे चिरंजीव आहेत.
3 / 8
फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिकलेले तेजस्वी यादव हे मूळचे क्रिकेटपटू आहेत. झारखंडमधून ते रणजी करंडकासाठी खेळले आहेत. शिवाय दिल्ली डेअरडेविल्समधूनही ते खेळले आहेत.
4 / 8
5 / 8
त्यांचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. 2010मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला. त्यानंतर 2013मध्ये लालूप्रसाद यांना अटक झाल्यामुळे तेजस्वींकडे पक्षाची धुरा गेली. राजकारणात आल्यानंतरही केवळ वयाची पंचवीशी गाठलेली नसल्याने त्यांना 2014मध्ये लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती.
6 / 8
मात्र, 2015मध्ये राघोपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. राजदच्या पाठिंब्याने बनलेल्या नितीशकुमार सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते. मात्र, एका घोटाळ्यात तेजस्वी यांचं नाव आल्यानंतर नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपची साथ धरल्याने त्यांचं उपमुख्यमंत्रिपद अल्पजीवी ठरलं.
7 / 8
सध्या लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. त्यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी सर्वाधिक 251 प्रचारसभा घेऊन प्रचाराचं रान उठवलं होतं.
8 / 8
अवघ्या वयाच्या 31व्या वर्षी तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत.