Marathi News Photo gallery Know what famous Cricketers childrens are doing now rahul dravid sachin tendulkar anil kumble Sourav Ganguly
कुंबळेची मुलं, द्रविडचा मुलगा, सौरव गांगुलीची मुलगी कुठल्या क्षेत्रात करीयर करतायत, तुम्हाला माहित आहे का?
भारतात क्रिकेटपटूंबद्दल (Indian cricketers) प्रचंड आकर्षण आहे. फक्त त्यांच्या धावा, संपत्ती आणि लाइफस्टाइलच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दलही चाहत्यांना प्रचंड कुतूहल असते.
1 / 9
भारतात क्रिकेटपटूंबद्दल प्रचंड आकर्षण आहे. फक्त त्यांच्या धावा, संपत्ती आणि लाइफस्टाइलच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दलही चाहत्यांना प्रचंड कुतूहल असते. या फोटो गॅलरीत आपण प्रसिद्ध क्रिकेटपटूंची मुलं काय करतात ते जाणून घेणार आहोत.
2 / 9
आरुनी कुंबळे ही अनिल कुंबळेची मुलगी आहे. ती पेशाने CA आहे. 27 वर्षाच्या आरुनीचा जन्म कर्नाटक बंगळुरुमध्ये झाला. बंगळुरुच्या सोफिया हाय स्कूलमधून तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. यूके लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधून तिने पदवी घेतली आहे.
3 / 9
सना गांगुलीचा जन्म कोलकाता बेहाला येथे झाला. ती आता 18 वर्षांची आहे. कोलकातामध्ये तिचे शालेय शिक्षण झाले आहेत. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ती शिक्षण घेत आहे. आई डोना गांगुलीसारखीच ती ओडिसी नृत्यांगना आहे. सौरव-डोनाची ती एकुलती एक मुलगी आहे. स्विमिंग, ट्रॅव्हलिंग आणि शॉपिंग तिचे आवडते छंद आहेत.
4 / 9
मायास कुंबळे हा 17 वर्षांचा आहे. बंगळुरुमध्ये त्याचा जन्म झाला. द इंटरनॅशनल स्कूल बंगळुरुमध्ये तो शिकतो. हा अनिल कुंबळेचा मुलगा आहे. स्वस्ती आणि आरुनी या त्याच्या दोन बहिणी आहेत. वाइल्डलाईफ फोटोग्राफीचा त्याला छंद आहे.
5 / 9
समित द्रविड 16 वर्षांचा आहे. तो राहुल द्रविडचा मुलगा आहे. माल्ल्या अदिती इंटरनॅशनल स्कूलचा तो विद्यार्थी आहे. राहुल द्रविडप्रमाणे त्याचा मुलगाही क्रिकेटपटू आहे. बंगोलर युनायटेड क्रिकेट क्लबचं अंडर 14 मध्ये त्याने प्रतिनिधीत्व केलं आहे.
6 / 9
अमिया देव ही कपिल देवची मुलगी आहे. दिल्लीमध्ये जन्मलेली अमिया 26 वर्षांची आहे. गुरगावमधून अमियाचं शालेय शिक्षण पूर्ण झालं आहे. युनायटेड किंगडमच्या सेंट अँड्रयूजमधून तिने शिक्षण घेतलं आहे. '83' सिनेमासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. ती एकुलती एक मुलगी आहे.
7 / 9
स्वस्ती कुंबळे 15 वर्षांची असून बंगळुरुमध्ये तिचा जन्म झाला. अनिल कुंबळेची ती धाकटी मुलगी आहे. बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय शाळेत तिचं शिक्षण सुरु आहे.
8 / 9
अर्जून तेंडुलकर हा सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. तो 22 वर्षांचा आहे. 2018 मध्ये त्याने अंडर-19 मध्ये डेब्यु केला. 2021 मध्ये त्याने टी-20 मध्ये डेब्यु केला. आयपीएल 2022 च्य़ा ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं.
9 / 9
सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकरची मुलगी आहे. शालेय शिक्षण मुंबईतून तर महाविद्यालयीन शिक्षण लंडनमधून पूर्ण केलं आहे. सारा सध्या मॉडेलिंग करत आहे. सोशल मीडियावर सारा तेंडुलकर लोकप्रिय आहे.