पश्मिना रोशन सोशल मीडियावर कायचम बोल्ड फोटो शेअर करते. बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरच सोशल मीडियावर पश्मिना रोशनची चांगली फॅन फाॅलोइंग देखील आहे.
पश्मिना रोशन ही हृतिक रोशनची चुलत बहीण आहे आणि संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी. गेल्या काही दिवसांपासून पश्मिना बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करते आहे.
यावेळी पश्मिना रोशन थोड्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलीये. गेल्या काही दिवसांपासून पश्मिना रोशनचे नाव कार्तिक आर्यनसोबत जोडले जात आहे.
इतकेच नाही तर पश्मिना आणि कार्तिक डेट करत असल्याची माहिती देखील मिळत आहे. पश्मिना दिसायला अत्यंत सुंदर असून लवकरच ती बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
पश्मिना रोशन नेमक्या कोणत्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार हे कळू शकले नाहीये. मात्र, कार्तिक आर्यनसोबत नाव जोडले जात असल्याने पश्मिना चर्चेत आलीये.