Marathi News Photo gallery Koena mitra did only 12 films her career ruined because of face plastic surgery also got 6 months jail
एका चुकीमुळे करिअर उद्ध्वस्त, 6 महिने राहिली तुरुंगात, कुठे गायब आहे ‘साकी साकी गर्ल’?
फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार असतात, जे करिअरच्या सुरुवातीच्या काळातच प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतात. पण नंतर ते असं काही करतात, ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बॉलिवूडमध्ये अशाच एका अभिनेत्रीचं करिअर तिच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालं. आज ती अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आयुष्य जगत आहे.
1 / 6
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कोएना मित्रा आहे. कोएनाने रितेश देशमुख, फरदीन खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि श्रेयस तळपदे यांसारख्या कलाकारांसोबत काम केलंय. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर यांच्या 'मुसाफिर' या चित्रपटातील कोएनाचं आयटम साँग खूप गाजलं होतं.
2 / 6
बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी कोएनाने 'मिस इंटरकॉन्टिनेंटल 2001' या सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या स्पर्धेत ती टॉप 12 पर्यंत पोहोचली होती.
3 / 6
कॉएनाने फक्त हिंदीतच नाही, तर तमिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलंय. 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटातील तिचं गाणंसुद्धा हिट ठरलं होतं. इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवूनही कोएना मित्रा आता ग्लॅमर विश्वापासून पूर्णपणे दूर आहे.
4 / 6
सुपरस्टार्ससोबत चांगल्या चित्रपटांमध्ये काम करूनही कोएनाचं फिल्मी करिअर उद्ध्वस्त का झालं, असा प्रश्न अनेकांना पडतो. कोएनाने अधिक सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र सर्जरीनंतर तिचा चेहरा खराब दिसू लागल्याचं चाहते म्हणू लागले.
5 / 6
चेहरा बिघडल्यामुळे कोएनाने पुन्हा एकदा करेक्शन सर्जरीसुद्धा केली. त्याला 'राइनोप्लास्टी' असं म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा तिच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम झाला. एका मुलाखतीत खुद्द तिनेच याचा खुलासा केला होता. "सर्जरीनंतर माझ्या चेहऱ्यावर खूप सूज आली होती. चेहरा पूर्णपणे बरा व्हायला एक वर्ष लागलं होतं", असं ती म्हणाली होती.
6 / 6
सर्जरी अयशस्वी ठरल्याने कोएना मित्राच्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम झाला आणि परिणामी तिला चित्रपट मिळणंसुद्धा बंद झालं. कोएनावर एक चेक बाऊन्सचाही केस होता. यामुळे तिला सहा महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. 'साकी साकी' गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोएनाने तिच्या करिअरमध्ये 12 चित्रपटांमध्ये काम केलं. तिने 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'बिग बॉस 13' मध्ये ती शेवटची दिसली होती.