‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘कोकण हार्टेड गर्ल’ला कोसळलं रडू; काय आहे कारण?
'बिग बॉस मराठी'चा नवीन सिझन हा पहिल्या एपिसोडपासूनच गाजतोय. सोशल मीडिया स्टार 'कोकण हार्टेड गर्ल'च्या खेळीकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. मात्र अंकिताला बिग बॉसच्या घरात रडू कोसळलं आहे. नेमकं काय झालं, ते पाहुयात..
1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोणतं वादळ येईल हे सांगता येत नाही. सोशल मीडिया गाजवणारी मालवणी चेडू अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धक म्हणून पोहोचली आहे. मात्र 'कोकण हार्टेड गर्ल'ला निक्की तांबोळीमुळे बिग बॉसच्या घरात अश्रू अनावर झाले आहेत.
2 / 5
आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिता रडत बसणार की सदस्यांना कोकणी हिसका दाखवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अंकिता निक्कीला म्हणते, "मला तुझ्यासोबत पाडापाडीचं काही खेळायचं नाहीये. तू माझ्यापासून लांब राहा".
3 / 5
त्यावर निक्की अंकिताला म्हणते, "तू दूर जा. माझी मर्जी, तुला मला उचलून घ्यायचंच नाही आहे." पुढे अंकिला तिला उचलून घेत म्हणते, "तुला आता मी असं उचलून घेऊ का?". अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो आणि ती म्हणते, "माझे हात पाहायचे आहेत का तुला कसे चालतात? परत हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचेन".
4 / 5
निक्कीसोबतच्या या बाचाबाचीनंतर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकरने रितेश देशमुखसमोर गाऱ्हाणं घालत 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रवेश केला होता.
5 / 5
पण हा मालवणी चेडू पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाला आहे. आता अंकिता वालावलकरचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास संपणार की पुढे सुरू राहणार हे प्रेक्षकांना आगामी एपिसोडमध्ये पहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'चा नवीन सिझन दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.