लक्झरी बस पुलावरून खाली, अपघाताचे भयानक दृश्य! पहा फोटो

| Updated on: Nov 09, 2023 | 10:44 AM

भूषण पाटील प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी कोल्हापूर | 9 नोव्हेंबर 2023 : कोल्हापूरच्या शाहूवाडीत कोकरूडमधील पुलावरून गोवा मुंबई ही लक्झरी बस नदीत कोसळलीये. सकाळी 6 वाजता हा अपघात घडलाय. या अपघाताचे फोटो बघून अपघात किती भयानक होता याचा अंदाज येतो. बस खाली कोसळून बस अक्षरशः चेपलीये. या अपघातातील प्रवाशांचं काय झालं? कसा झाला अपघात? पहा फोटो...

1 / 5
आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या शाहूवाडीत लक्झरी बसचा अपघात झालाय. या अपघाताचे फोटो बघून अपघात किती भयानक होता याचा अंदाज येतो. सुदैवाने यात असणारे सगळे प्रवाशी सुखरूप आहेत.

2 / 5
कोल्हापूर शाहूवाडी मध्ये अपघात, गोवा मुंबई ही लक्झरी बस आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वारणा नदीत कोसळली. कोकरूडच्या पुलावर ड्रायव्हरला अंदाज आला नाही आणि हा अपघात घडला.

3 / 5
कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूडच्या असणाऱ्या पुलावरून ड्रायव्हरला अंदाज न आल्याने लक्झरी बस खाली गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कुणीही जखमी झालेलं नाही.

4 / 5
या लक्झरी बसमधील प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने पाठवण्यात आलंय. हे दृश्य पहा, ही बस गोवा ते मुंबई कराड मार्ग जाणारी ट्रॅव्हल्स शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीतील वारणा नदीत कोसळलीये.

5 / 5
हा अपघात सकाळी सहा वाजता झालाय. फोटोमधील दृश्य बघून "प्रवाशांचं नशीब बलवत्तर" होतं असंच म्हणावं लागेल.