‘क्रिश’मध्ये लहानपणीच्या हृतिकची भूमिका साकारणारा मुलगा आठवतोय का? आता बनला डॉक्टर

| Updated on: Jul 04, 2024 | 1:06 PM

राकेश रोशन यांच्या 'क्रिश' या चित्रपटात हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये लहानपणीच्या हृतिकच्या भूमिकेत बालकलाकार मिकी धामिजानी होता. आता मिकी हा अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. तो आता डोळ्यांचा डॉक्टर बनला आहे.

1 / 5
हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'क्रिश' या चित्रपटात हृतिकच्या लहानपणीची भूमिका साकारलेला मुलगा आठवतोय का? या चित्रपटात बालकलाकार मिकी धामिजानीने लहानपणीच्या हृतिकची भूमिका साकारली होती. आता मिकी काय करतोय, हे तुम्हाला माहित आहे का?

2 / 5
मिकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केली आहे. यामध्ये लहानपणापासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास पहायला मिळतोय. अभिनयक्षेत्रात काम करणारा मिकी आता डॉक्टर बनला आहे. या व्हिडीओमध्ये 'क्रिश' चित्रपटातील फुटेज आणि हृतिक रोशन, राकेश रोशन यांच्यासोबतचे फोटोसुद्धा पहायला मिळत आहेत.

3 / 5
'तुम्ही कदाचित मला याआधी पाहिला असाल. ओह अर्थातच तुम्ही पाहिलं असेल. मला ज्युनिअर क्रिश साकारण्याची अभूतपूर्व संधी मिळाली होती. अत्यंत प्रतिभावान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. बालकलाकार ते डोळ्यांचा सर्जन बनवण्यापर्यंतचा माझा प्रवास विस्मयकारक आहे', असं त्याने लिहिलंय.

4 / 5
'आयुष्यातील हे परिवर्तन अद्भुत अनुभवांनी आणि अपवादात्मक शिकवणींनी भरलेलं आहे. अभिनय क्षेत्रात काम करताना मिळालेले धडे हे माझ्या आताच्या क्षेत्रात प्रोत्साहन देतात. या अनोख्या वाटेवरील प्रत्येक पावलाबद्दल मी कृतज्ञ आहे. आता मी तुमच्या आय केअरचा सुपरहिरो बनू शकतो', अशा शब्दांत त्याने प्रवास मांडला आहे.

5 / 5
मिकीच्या या रीलवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'चित्रपटात जादूने त्याच्या वडिलांचा चष्मा घालवला आणि आता ज्युनिअर हृतिक डोळ्यांचा डॉक्टर बनला आहे', असं एकाने लिहिलं. तर 'शक्तीयों का सही इस्तेमाल', असं दुसऱ्याने म्हटलंय.