Marathi News Photo gallery Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame shilpa saklani reveals pregnancy struggles failed to conceive for 18 years then blessed with baby girl married at age of 21 apurva agnihotri
स्मृती इराणींची ऑनस्क्रीन सून लग्नानंतर 18 वर्षांनी बनली आई, बाळासाठी बरेच प्रयत्न केलेलं, पण…
'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री अखेर लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी आई बनली आहे. आई बनण्याच्या या प्रवासात लग्नानंतर आयुष्यात आलेल्या चढ-उतारांच्या अनुभवाबद्दल सांगितलं.
1 / 10
बाळासाठी प्रचंड तरसलेली ही अभिनेत्री. लग्नानंतर 18 वर्षांनी मिळालं आई बनण्याच सुख. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये या अभिनेत्रीने काम केलय.
2 / 10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा सकलानीच वयाच्या 21 व्या वर्षी लग्न केलं. लहानपणी तिने हे मेनिफेस्ट केलेलं. जे सत्यात उतरलं.
3 / 10
लग्नानंतर मातृत्वाच सुख तिला 18 वर्षांनी मिळालं. शिल्पा सकलानीने रुबीना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रेग्नेंसी जर्नीबद्दल सांगितलं.
4 / 10
लग्नानंतर चार वर्षांनी तिला बाळ हवं होतं. तिने देवाकडे मुलगी मागितलेली. अपूर्व अग्निहोत्री सारखी दिसणारी मुलगी तिला हवी होती.
5 / 10
तिला आई बनण्यासाठी 18 वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या दरम्यान कंसीव करण्याचा तिने बराच प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही.
6 / 10
शिल्पा म्हणते, माझा कर्मावर विश्वास आहे. मूल थोडं लेट झालं 18 वर्षांनी. माझी मुलगी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार आहे. ती आता 17 महिन्यांची आहे.
7 / 10
मी या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे. निराशेचा एक छोटा काळ होता. कारण मूल होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो. पण काही होत नव्हतं, असं तिने सांगितलं.
8 / 10
शिल्पाला देवावर विश्वास होता. एक दिवस मूल होईल. ती आता एका मुलीची आई आहे. लग्नानंतर 18 वर्षांनी हे सुख मिळालय.
9 / 10
'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेने शिल्पाला ओळख मिळवून दिली. स्मृती इराणी यांनी शिल्पा सकलानीच्या सासूचा रोल केलेला. तिने गंगाचा रोल केलेला. जस्सी जैसी कोई नही, कुसुम, बिग बॉस 7 मध्ये ती दिसलेली.
10 / 10
मी रोज माझ्या मुलीला पाहून आनंदी होते. तू किती गोड दिसतेस असं मी तिला म्हणते. ती माझ्यासाठी एक आशिर्वाद आहे असं शिल्पा म्हणते. 2004 साली अभिनेता अपूर्व अग्निहोत्री बरोबर लग्न केलं.