वीस किलोंची पालखी अन् दैवी शक्तीचा भास; अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा अनुभव
झी मराठी वाहिनीवर 8 जुलैपासून रात्री 8.30 वाजता 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सुरू झाली. या मालिकेतील पहिला एपिसोड चांगलाच गाजला. यात्रेतला हा सीन सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
1 / 5
झी मराठीवर नव्यानेच दाखल झालेल्या 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला आणि हा भाग पाहताच प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आणि सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद यायला सुरुवात झाली.
2 / 5
जो क्षण आणि जो सीन प्रेक्षकांच्या हृदयात आणि मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात नेहमीसाठी कोरला गेला तो म्हणजे सूर्यादादाचा यात्रेमधला सीन. नितीश चव्हाणसाठी एक अभिनेता म्हणून तो सीन साकारण्याचा अनुभव कसा होता हे व्यक्त करताना त्याने सांगितलं, " जेव्हा मला कळलं की यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे तेव्हापासून मनात धाकधूक होती. कसं होईल, काय करता येईल हे विचार सतत डोक्यात चालू होते."
3 / 5
"जेव्हा तो दिवस आला तोपर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं. कारण अंगात येणं हे मी आजपर्यंत कधी अनुभवलं नव्हतं. म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला," असं त्याने सांगितलं.
4 / 5
याविषयी तो पुढे म्हणाला, "सीनसाठी तयार झाल्यानंतर मी सर्वात आधी देवीसमोर गेलो आणि तिचा आशीर्वाद घेतला. मला माहित नाही कसं करायचं, काय करायचं? तूच माझ्याकडून हे सर्व नीट करून घे, अशी तिच्याकडे प्रार्थना केली. मी पहिला टेक केला आणि तो संपल्यानंतर सर्वानी टाळ्यांचा गजर केला."
5 / 5
"देवीच्या पालखीबद्दल बोलायचं झालं तर वीस किलोंची ती पालखी होती आणि आर्टदादांनी तर कमालच केली होती. वीस किलोंची पालखी आणि तो पेहराव, त्यासोबत डायलॉग्स बोलायचं हे सगळं करण्यात दमछाक झाली होती. एकदा, दोनदा मला चक्करही आली पण तरी मी थांबलो नाही. कारण ती एक ऊर्जा आणि शक्ती अंगात होती," अशा शब्दांत नितीश व्यक्त झाला.