Lalbaugcha Raja Visarjan 2023 | ‘ही शान कोणाची लालबागच्या राजाची’ चौपाटीवरील खास PHOTOS
Lalbaugcha Raja Visarjan 2023 | लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर आज सकाळी 8 च्या सुमारास पोहोचली. यावेळी सुद्धा लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते.
-
-
तब्बल 22 तासाच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा आज सकाळी 8 च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी चौपाटीवर मोठी गर्दी आहे.
-
-
सकाळी 10 वाजता लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली होती. सुरुवातीपासून भाविकांची मोठी गर्दी या मिरवणुकीत होती.
-
-
नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळे देशभरातून भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात.
-
-
अनंतचतुदर्शनी काल होती. आज दुसरा दिवस आहे. मात्र, तरीही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी उसळली होती. मोठ्या भक्तीभावात, उत्साहात लालबागच्या राजाची आरती संपन्न झाली.
-
-
लालबागच्या राजासह अन्यही काही गणेश मंडळांच्या मुर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आहेत. मागच्या 10 दिवसात लाखो भाविकांनी लालबागच्या राजाच दर्शन घेतलं.