अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांचा 2020 मध्ये खाली-पीली चित्रपट आला होता, त्याच्यानंतर दोघेही अनेकदा बाहेर एकत्र फिरताना दिसले आहेत. तसेच त्यांच्यात अफेअर असल्याची देखील चर्चा आहे.
गेल्या वर्षांपासून अनन्या पांडे ईशान खट्टर यांच्यात अफेअर असल्याची चर्चा आहे, परंतु दोघांनीही याला अद्याप उत्तर दिलेलं नाही.
शनिवारी रात्री दोघेही उशिरा एका ठिकाणी दिसले आहेत, त्यानंतर दोघेही एकाच गाडीतून घरी सुध्दा गेल्याचे पाहण्यात आले आहे.
ईशान खट्टर याने पुर्णपणे काळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यामुळे त्याचा एक वेगळा लुक चाहत्यांना आणि प्रत्यक्षदर्शिना पाहायला मिळाला.
ईशान खट्टर याचा 2020 ला खाली पीली चित्रपट आल्यापासून तो इंडस्ट्रीपासून अधिक लांब गेला आहे. तसेच त्याच्या दोन चित्रपटांचं शुटिंग पुर्ण झालं आहे.