लिंबू पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी आपण लिंबू पाणी पितो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, लिंबू पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा असतो. यामुळे नियमित मर्यादित स्वरुपात लिंबू पाणीचे सेवन केल्यास त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.
लिंबू पाण्यामध्ये तुम्ही मध देखील मिक्स करू शकता. मात्र, जेंव्हा लिंबू पाण्यात मध मिक्स करत आहात त्यावेळी त्यामध्ये कोमट पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. गरम पाण्यामध्ये मध मिक्स करणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
लिंबू पाणी प्यायल्यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते.
हे पिण्यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधीही दूर होते. दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू पाणी प्यायल्याने दात आणि हिरड्यांच्या समस्येवर आराम मिळतो.