leopard Photo | विहिरीत पडलेल्या बिबट्याचा बछड्याला वाचवण्यासाठी कसे राबवले गेले रेस्क्यू

| Updated on: Sep 23, 2023 | 11:41 AM

Pune leopard Photo | पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी गावात आणि शेतांमध्ये येण्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. पुणे लोहगाव येथे एक बिबट्याचा बछडा विहिरीत पडला. त्याला वाचवण्यसाठी रेस्क्यू राबवण्यात आले.

1 / 5
पुणे येथील लोहगावमधील वडगाव शिंदे या गावातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडला. बिबट्याचा बछडा तीन महिन्यांचा आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पुणे वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचली.

2 / 5
बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती मिळताच पुणे वन विभागाची टीम लोहगावमध्ये दाखल झाली. टीमने पिंजरा विहिरीत सोडला. त्यानंतर या बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात येण्यासाठी वन विभागाच्या टीमला अथक प्रयत्न करावे लागले.

3 / 5
वन विभागाच्या टीमला चार तास प्रयत्न करावे लागले. त्यानंतर बछडा पिंजऱ्यात दाखल झाला. बछडा पिंजऱ्यात जाताच टीमकडून दरवाजा बंद करण्यात आला. त्यानंतर दोरच्या साह्याने पिंजरा विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

4 / 5
चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या विहिरीचा बाहेर आला. त्यानंतर त्या बछड्याला त्याच्या आईकडे पाठवण्यात आले. आई आणि बछडा यांच्या भेटीचा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आलाय. नुकताच हा व्हिडीओ रेस्कू टीमने शेअर  केला आहे.

5 / 5
गावात हल्ले करणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने अनेक वेळा पिंजरे लावले. परंतु बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यासाठी केलेले रेस्क्यू हा दुर्मिळ प्रसंग होता. ही घटना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.