बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी फोटो शेअर करत असते.
या फोटोमध्ये अदितीने सुंदर सिल्क कुर्ता-शरारा सेट कॅरी केला आहे. आदितीचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडला आहे.
तिनं तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अदिती खूपच सुंदर दिसत आहे.
या ड्रेससह, आदितीने मरून रंगाची बिंदी, सिल्वर रंगाची अंगठी आणि कानातले घातले आहेत. हे एक्सेसरीज जयपूरमधील नीता बूचरा हाऊसच्या सिल्व्हर सेंटरमधील आहेत.
आदितीचा हा ड्रेस डिझायनर आस्था नारंग यांनी डिझाईन केला आहे. ज्यावर भारतीय पारंपरिक हँडवर्क 'सिल्मा' 'सितारा' चे काम केले गेले आहे. या शरारा सेटची किंमत डिझाइनरच्या वेबसाइटवर 48,000 रुपये आहे.