Anti Aging Face Mask: चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी हे अँटी-एजिंग फेस मास्क फायदेशीर!
सुरकुत्या, त्वचा सैल होणे आणि चेहऱ्यावरील रेषा ही वृद्धत्वाची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वयंपाकघरात असलेल्या घटकांपासून अँटी-एजिंग फेस मास्क बनवू शकता. हे घरगुती फेस मास्क आपण चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करू शकतो. चला तर मग पाहूयात घरच्या-घरी हे फेस मास्क कसे तयार करायचे
1 / 5
सुरकुत्या, त्वचा सैल होणे आणि चेहऱ्यावरील रेषा ही वृद्धत्वाची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वयंपाकघरात असलेल्या घटकांपासून अँटी-एजिंग फेस मास्क बनवू शकता. हे घरगुती फेस मास्क आपण चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करू शकतो. चला तर मग पाहूयात घरच्या-घरी हे फेस मास्क कसे तयार करायचे.
2 / 5
ग्रीन टी तयार करा आणि थोडी थंड होऊ द्या. दोन चमचे ग्रीन टी घ्या आणि त्यात एक चमचा एलोवेरा जेल घाला. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. हलक्या हातांनी मसाज करा. 15-20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. आठ दिवसामधून हा फेस मास्क आपण चेहऱ्याला लावला पाहिजे.
3 / 5
एक अंडे फोडून एका भांड्यात ठेवा. ते चांगले फेटून एका भांड्यात घ्या आणि त्यात एक चमचा ताजे दही घाला. ते एकत्र मिसळा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. ते धुण्यासाठी ताजे पाणी वापरा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.
4 / 5
एक वाडगा घ्या आणि त्यात 2 चमचे मध पाण्यात मिसळा. आता दुसऱ्या भांड्यात अंडे फेटून घ्या. मधाच्या मिश्रणात फेटलेली अंडी घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा. त्यानंतर हे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर आपली त्वचा थंड पाण्याने धुवा.
5 / 5
एक पिकलेले केळ घ्या. त्याची साल काढा. त्याचे लहान तुकडे करा आणि मॅश करा. मॅश केलेल्या केळ्याने काही वेळ चेहरा आणि मानेला मसाज करा आणि नंतर 10-15 मिनिटे राहू द्या. ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे आपण परत करू शकतो. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)