Skin Care : बटाट्याचे जादूई उपयोग तुम्हाला माहित आहेत का? हे फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि नितळ त्वचा मिळवा!
शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानला जाणारा बटाटा त्वचेसाठी चांगला मानला जातो. आजकाल यापासून बनवलेली अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यांच्यापासून त्वचेची उत्तम काळजीही घेता येते. तसेच आपण बटाट्यापासून काही फेसपॅक तयार करून त्वचेसाठी वापरले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होण्यास मदत होते.
1 / 5

2 / 5
फेसपॅक बनवण्यासाठी बटाट्याचा रस काढून त्यात थोडासा मध मिसळा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 10 मिनिटांनी धुवा. बटाटा त्वचेवरील टॅन काढून टाकते, तर मध त्वचेला ओलावा देते. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने त्वचाही चमकदार होईल.
3 / 5
बटाट्याचा रस काढून त्यात किसलेल्या टोमॅटोचा लगदा टाका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मधही घालू शकता. हे चेहऱ्यावर लावल्याने टॅन दूर होण्यासोबतच पिंपल्सची समस्याही दूर होईल.
4 / 5
बटाट्याप्रमाणेच लिंबू देखील चांगली चमक आणण्यासाठी प्रभावी आहे. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा चमकदार बनवते. हा पॅक बनवण्यासाठी बटाट्याच्या रसात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी थोडा मसाज करून चेहरा धुवा. लिंबू त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करेल.
5 / 5
बटाट्याच्या रसामध्ये मुलतानी मातीचे घट्ट मिश्रण बनवा आणि चेहऱ्यावर लावल्यानंतर कोरडे होऊ द्या. बटाट्यासोबत मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स तर दूर होतातच पण टॅन कमी होण्यासही मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)