तुम्हाला देखील आहे थायरॉइड? ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका, होईल कठीण
थायरॉइडचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असतं. थायरॉइडमुळे महिलांना मासिक पाळी देखील वेळेत येत नाही. एवढंच नाही तर आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे बदलेली जीवनशैली देखील थायरॉइडसाठी कारणीभूत आहे.
1 / 5
थायरॉइड असल्यास कायम खायला हवं आणि काय नको यावर नक्की लक्ष द्या. वैद्यकीय भाषेत याला हायपोथायरॉइडीझम असे म्हटले जाते. मात्र डाएट, योग्य आहार, व्यायाम किंवा इतर उपायांनी ते मॅनेज करता येते.
2 / 5
थायरॉइडमुळे थकवा येतो, वजन वाढतं, ड्रास स्किन, चेहऱ्यावर सूज, कोलेस्ट्रॉचं वजन देखील मोठ्या प्रमाणात वाढतं. शिवाय डिप्रेशनची समस्या देखील वाढते. थायरॉइड असल्यास काही पदार्थ आजच खायचं टाळा... ज्यामुळे होणार त्रास कमी होऊ शकतो. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...
3 / 5
थायरॉइड असल्याच रेड मीट खाणं टाळा. रेड मीटमुळे वजन वाढतं. त्यामुळे थायरॉइड असल्यास रेड मीट खाऊ नका.. शिवाय दारुचं देखील सेवन करु नका. दारु प्यायल्यामुळे थायरॉइड ग्रस्त लोकांना झोपेच्या समस्या निर्माण होतात.
4 / 5
कॉफी प्यायल्यामुळे थायरॉइडच्या लेव्हलमध्ये वाढ होत नाही, पण होणाऱ्या त्रासाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. ज्यामुळे अस्वस्थ होतं आणि झोपेच्या समस्या देखील निर्माण होतात.
5 / 5
बाजात मिळणारे तेलकट पदार्थ देखील खाणं टाळा. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर, मिठ देखील प्रमाणात खायला हवं.