Argan Oil Benefits : आर्गन तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी, वाचा!
आर्गन तेल जगातील सर्वात महाग तेलांपैकी एक आहे. हे आर्गन झाडापासून काढले जाते. हे तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशी आहे. अनेक वर्षांपासून सौंदर्य वाढवण्यासाठी महिला या तेलाचा उपयोग करतात. तसेच अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये या तेलाचा वापर केला जातो.
1 / 5

2 / 5
आर्गन तेलामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक प्रकारची खनिजे असतात. जी त्वचेला सुधारण्याबरोबरच अनेक समस्यांपासून त्वचेचे संरक्षण करतात. विशेष म्हणजे हे तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
3 / 5
आर्गन तेल मॉइश्चरायझर म्हणून वापरले जाते. ज्यामुळे त्वचेला खोल ओलावा मिळतो. जर तुम्हाला त्याचा चांगला फायदा घ्यायचा असेल तर रात्री झोपताना तोंड धुल्यानंतर काही वेळ आर्गन तेलाने चेहऱ्याची मालिश करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.
4 / 5
जर त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्याची समस्या असेल तर आर्गन फायदेशीर आहे. हे जीवनसत्त्वे ए आणि ई, ओमेगा फॅटी अॅसिडस्, सॅपोनिन्स आणि मेलाटोनिनचा चांगला स्त्रोत आहे. त्याच्या नियमित वापराने तुमची त्वचा घट्ट होते आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो.
5 / 5
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर तुम्ही आर्गन तेल वापरले पाहिजे. आर्गन तेल मुरूमाची समस्या देखील दूर करते. या व्यतिरिक्त स्ट्रेच मार्क्स आणि मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त मानले जाते. आर्गन तेल अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी हे उपयुक्त आहे.