Health Tips | अल्कोहोलबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच, वाचा!
जर आपल्याला खाण्यापिण्याची खूप आवड असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणे देखील फार आवडते. या व्यतिरिक्त जेव्हा आपण मद्यपान करण्यासाठी बाहेर पडतो किंवा घरी पार्टी करतो, तेव्हा नंतरचा हँगओव्हर टाळण्यासाठी आपण बर्याचदा स्नॅक्सचे सेवन करतो.
1 / 5
जर आपल्याला खाण्यापिण्याची खूप आवड असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणे देखील फार आवडते. या व्यतिरिक्त जेव्हा आपण मद्यपान करण्यासाठी बाहेर पडतो किंवा घरी पार्टी करतो, तेव्हा नंतरचा हँगओव्हर टाळण्यासाठी आपण बर्याचदा स्नॅक्सचे सेवन करतो. मात्र, अल्कोहोलबरोबर काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
2 / 5
ब्रेड आणि बिअर एक हानिकारक कॉम्बीनेशन आहे आणि हे अजिबात विसरू नये. अल्कोहोलसोबत ब्रेड खाऊ नये. ब्रेड खाल्ल्याने पोट फुगी होते. यामुळे आपले शरीर डीहायड्रेट होते. आपण जास्त प्रमाणात बिअर आणि ब्रेड खाल्ल्यास उलट्याही होऊ शकतात.
3 / 5
कॉफी आणि अल्कोहोल हे एक चांगले संयोजन आहे, असे आपल्याला वाटेल. ड्रिंक करताना कॉफी प्यायल्यास शरीर डिहायड्रेट होते. त्याच वेळी, हे संयोजन काही लोकांना सतर्क राहण्यास मदत करते. जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान केले असेल तर मात्र परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
4 / 5
काही लोकांना वाटते की, वाईनसह चॉकलेट खाणे चांगले स्नॅक्स आहे. पण तसे अजिबात नाही. चॉकलेटमुळे पोटात गॅसची समस्या वाढू शकते. याशिवाय अपचन देखील होऊ शकतो.
5 / 5
अनेकांना मद्यपान करताना खारट किंवा तळलेल्या चमचमीत गोष्टी खायला आवडतात. या गोष्टी खाल्ल्याने तुमचे शरीर डीहायड्रेट होते. याशिवाय शारीरिक ऊर्जा देखील कमी होते. म्हणून, पेय दरम्यान ग्रील्ड चिकन आणि भाजीपाला युक्त पदार्थ खा.