Health Care Tips | संधिवात असलेल्या लोकांनी ‘या’ पदार्थांपासून चार हात लांबच राहावे!
संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात.
1 / 5
संधिवातच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. वाढत्या वयामुळे लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधे आणि हाडांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. वजन वाढणे आणि कमकुवत स्नायू यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. संधीवातदरम्यान आहारामध्ये नेमके कोणते पदार्थ टाळावेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
2 / 5
संधिवात वेदना दरम्यान प्रक्रिया केलेले अन्न खाणे पूर्णपणे टाळायला हवे. प्रक्रिया केलेले अन्न शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे दाह वाढू शकतो. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जर आपल्याला संधिवातेचा त्रास होत असेल तर आपण प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळलेच पाहिजे.
3 / 5
संधिवातमध्ये गोड पेये आणि जास्त गोड पदार्थांचे सेवन करू नये, यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. याशिवाय ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळेच संधिवात असलेल्या लोकांना गोड पदार्थ अजिबात खायला देऊ नका. यामुळे समस्या वाढण्याची शक्यता असते.
4 / 5
संधिवात असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ सेवन हानिकारक ठरते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. मीठ जास्त सेवन केल्यास जळजळ वाढते. संधिवात असलेल्या लोकांनी जास्त मीठ आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
5 / 5
संधिवात असलेल्या लोकांनी फास्ट फूड आणि बेक केलेले पदार्थ अजिबात आहारामध्ये घेऊ नये. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, जास्त साखर आणि रिफाइंड इत्यादी असतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.