Dandruff : कोंडा होण्याची समस्या वाढली आहे का तर करा हे घरगुती उपाय
Dandruff Cure : हिवाळा सुरु झाला की अनेकांना कोंडा होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. कोंडा झाल्याने टाळूवर लाल चट्टे पडतात. खाज येते त्यामुळे अनेकदा सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्याला लाज वाटते. पण ही समस्या वाढण्याआधीच काही घरगुती उपाय तुम्ही करु शकतात.
1 / 4
तुम्हाला सुंदर केस हवे आहेत तर त्याची निगा व्यवस्थित राखावी लागेल. वातावरण बदलले की, केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण देखील वाढतं. अनेकांना या समस्याला सामोरे जावे लागते. ही समस्या कोणत्याही ऋतूत उद्भवू शकते, परंतु हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. अनेक जण या समस्येपासून सुटका व्हावी म्हणून अँटीडँड्रफ शॅम्पू वापरतात. परंतु काही घरगुती उपाय करुन तुम्ही कोंडा होण्याची समस्या दूर करु शकतात.
2 / 4
कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे कोंडा कमी करण्यास मदत करु शकतात. ताजे कोरफड जेल घेऊन ते टाळूवर लावा आणि 30 मिनिटांनी धुवून टाका. खाज येत असेल तर ती कमी करण्यास मदत करु शकते.
3 / 4
यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात ज्यामुळे बुरशीपासून लढण्यास मदत करतात. एका भांड्यात पाणी आणि ऍपल सायडर व्हिनेगरचे समान भागात घेऊन ते टाळूवर लावा. त्यानंतर 15-20 मिनिटे लावून ठेवा. हा कोंडा कमी करण्यात मदत करू शकते.
4 / 4
खोबरेल तेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे टाळूवरील कोरडेपणा आणि चट्टे कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही खोबरेल तेल गरम करून लावा त्यानंतर मसाज करा. केस धुण्यापूर्वी काही तास किंवा रात्रभर राहू द्या. असे नियमित केल्यास केसांचे आरोग्य सुधारू शकते आणि कोंडा कमी होतो.