मधुमेही रूग्णांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदलही करावेत. जर मधुमेही रूग्णाला निरोगी राहिचे असेल तर त्यांनी आपल्या आहारमध्ये काही खास घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. हे घटक नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
तुळस शरीरातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि मानसिक आरोग्य सुधारतात. यामुळे तुळशीचा आहारामध्ये समावेश करा.
आले सूज कमी करण्यात मदत ककते. आल्याचा रस शरीरात इन्सुलिन तयार होण्यासही मदत करतो. आले रक्तातील साखरेची पातळी राखण्यासही मदत करते. यामुळेच मधुमेही रूग्णांनी आपल्या दररोजच्या आहारमध्ये आल्याचा नक्कची समावेश करावा.
सकाळी मेथी भिजवलेले पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामध्ये फायबर देखील असते, जे मधुमेहाची समस्या दूर करण्यास मदत होते. मेथीचे दाणे रात्रीच पाण्यात भिजत ठेवा.
मधुमेह