Diet For Kidney : किडनी निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा आहारात समावेश करा!
किडनी हा प्रत्येकाच्या शरीराचा सर्वात अविभाज्य भाग आहे. निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहारासाठी किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्ही रोजच्या रोज अस्वास्थ्यकर पदार्थांचे सेवन करत असाल तर ते फक्त शरीरालाच नाही तर किडनीलाही हानिकारक आहे.
1 / 6
किडनी हा प्रत्येकाच्या शरीराचा सर्वात अविभाज्य भाग आहे. निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहारासाठी किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्ही रोजच्या रोज अस्वास्थ्यकर पदार्थांचे सेवन करत असाल तर ते फक्त शरीरालाच नाही तर किडनीलाही हानिकारक आहे. यामुळेच किडनी खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही आरोग्यदायी गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
2 / 6
मासे किडनीसाठी फायदेशीर आहेत. माशांचे सेवन किडनीसाठी सर्वात फायदेशीर आहे. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते. आहारात माशांच्या सेवनाचा समावेश केल्यास आपण किडनीच्या समस्यांपासून दूर राहू शकतो.
3 / 6
सफरचंद खायला सर्वांनाच आवडते. सफरचंद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते. जे सफरचंद खाल्ल्याने किडनीला फायदा होतो.
4 / 6
लसूण खाणे सर्वांनाच आवडत नाही. परंतू लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लसणामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे आपली किडनी निरोगी राहण्यास खूप मदत होते.
5 / 6
शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते. यामुळेच शिमला मिरची आपल्या किडनीला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
6 / 6
कोबीची भाजी साधारणपणे हिवाळ्यात खाल्ली जाते. कोबीमध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे दररोजच्या आहारामध्ये कोबीचा समावेश करा.