Yoga Poses : चांगल्या आरोग्यासाठी ‘हे’ 5 योगासन नियमित करा!
पश्चिमोत्तानासन हे मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. पश्चिमोत्तानासनमुळे आपली पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच मनाला शांत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी हे आसन चांगले आहे.
1 / 5
पश्चिमोत्तानासन हे मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. पश्चिमोत्तानासनमुळे आपली पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच मनाला शांत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी हे आसन चांगले आहे.
2 / 5
अधोमुख श्वानासन हे आसन संपूर्ण शरीराला आराम करण्यास मदत करते. हे हात आणि खांदे मजबूत करते. हे आसन आपण दररोज केल्याने संपूर्ण शरीराला उर्जा मिळते.
3 / 5
अंजनेयासन या आसन दरम्यान, लोअर बॅकवर खूप दबाव येतो. हे आसन करताना सुरूवातीला तुम्हाला थोडा त्रास होईल. हे आसन केल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
4 / 5
काउ पोज हे आसन आपले मणके आणि मानेच्या स्नायूला आराम देते. ज्यामुळे मणक्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. ज्यांचे मनके दुखतात, त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.
5 / 5
सेतु बंधासन हे आसन पाठीच्या स्नायूंना बळकट करते. उदासीनता दूर करण्यास मदत करते. हे मागच्या स्नायूंना आराम देते. या आसनामुळे छाती आणि मानेवर एक चांगला ताण येतो.