आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात तूप, तिळाचे तेल आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा. हे आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करतात.
आले, दालचिनी, ग्रीन टी, लिंबू-मध इत्यादी घटक मिक्स करून आपण घरच्या-घरी हर्बल टी तयार करू शकता. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे यकृत निरोगी राहते.
हिवाळ्याच्या हंगामात रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या पायांची तूप, तीळ किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करा.
हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा खूप वाढतो. अशा स्थितीत तीळ, एरंडेल, बदाम, मोहरी आणि ऑलिव्ह ऑईल या तेलांनी आपल्या केसांची मालिश करा.