नारळ तेलामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. नारळ तेलाने चेहऱ्याला मालिश केल्याने त्वचा तजेलदार होते. साधारण 5 ते 10 मिनिटे चेहऱ्याला मालिश करा.
कोरफडचा गर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चेहरा आणि मानेवर 15 ते 20 मिनिटांसाठी कोरफडचा गर लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
त्वचेसाठी लिंबू अत्यंत फायदेशीर असते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, हे कोलेजन बनवते. यामुळे आपली त्वचा चमकदार बनण्यास मदत होते.
काकडी त्वचेवर एक टोनर म्हणून काम करते. काकडी किसून घ्या आणि त्याचा रस आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.
चंदनाची पेस्ट आपण दररोज चेहऱ्यावर लावली पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)