जर तुम्हाला तजेलदार आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही दररोज सकाळी आवळ्याचा ताज्या रस प्या. जर आपण आवळ्याच्या रसामध्ये थोडा मध आणि हळद टाकून पिले तर अतिशय फायदेशीर आहे. यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढते आणि आपली त्वचा तरूण दिसते.
त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेला मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच, आठवड्यातून एक किंवा दोनदा तांदळाचा पॅक वापरा. ते बनवण्यासाठी एक चमचा तांदळाच्या पावडरमध्ये दूध, मध घालून चांगले मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा.
मेकअप काढण्यासाठी आणि तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी सौम्य आणि सल्फेट मुक्त फेस क्लीन्सर वापरा. तुमचे मॉइश्चरायझर जास्त घट्ट नसावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कच्च्या दुधाचा क्लिंझर म्हणूनही वापर करू शकता.
त्वचा सुंदर हवी असेल तर दिवसभरामध्ये जास्तीत-जास्त पाणी प्या. जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपली त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. तसेच कोरड्या त्वचेची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
त्वचा नैसर्गिकरीत्या चमकण्यासाठी शरीराला आतून निरोगी ठेवणेही महत्त्वाचे आहे. यासाठी काजू, दूध, अंकुरलेले धान्य, फळे, कडधान्ये, हिरव्या भाज्या, कोशिंबीर, नारळ पाणी, ताक इत्यादी गोंष्टीचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.