आपण चेहऱ्याच्या त्वचेची अधिक काळजी घेतो. त्या तुलनेत आपण पायाच्या त्वचेची काळजी ही घेत नाहीत. यामुळे पायांवर काळपटपणा आणि टॅन तयार होतो.
पायावरील टॅन दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रिम लावतो. मात्र, तरीही पायावरील टॅन कमी होत नाही. पायावरील टॅन कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे टॅन कमी होण्यास मदत होते.
एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात एक चमचा ताजे दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या पायांना लावा. त्यानंतर थोडा वेळ पायांची मालिश करा. हे त्वचेवर 8-10 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर पाय थंड पाण्याने धुवा.
हळद आणि बेसन पीठ एका भांड्यामध्ये मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या पायांवर लावा. त्यानंतर वीस मिनिटे ठेवा आणि पाय धुवा. यामुळे टॅन जाण्यास मदत होते.
पायावरील टॅन कमी करण्यासाठी पपईचा लगदा तीन चमचे घ्या. त्यामध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट आपल्या पायांना लावा. यामुळे पायावरील टॅन जाण्यास मदत होते.