Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘ही’ खास 5 पेय प्या!
वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्ने केले जातात. जर आपल्याला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर आपण दररोज खालील खास 5 पेय घेतले पाहीजेत. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी, जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय घेतले पाहिजे.
1 / 5
वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्ने केले जातात. जर आपल्याला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर आपण दररोज खालील खास 5 पेय घेतले पाहीजेत. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी, जिरे, धने आणि बडीशेपचे खास पेय घेतले पाहिजे. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल.
2 / 5
वाढलेले वजन कमी करण्यासाठी काकडी, लिंबू आणि आद्रकचे खास पेय तयार करा, यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. हे पेय तयार करण्यासाठी एक काकडी, दोन चमचे आद्रकचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस लागेल.
3 / 5
ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता.
4 / 5
हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे इलायची, एक चमचा हिंग, एक चमचा जिरे, एक चमचा काळी मिरी आणि दोन चमचे मध लागणार आहे. हे पेय तयार करण्यासाठी फक्त मध सोडून इतर सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि एक ग्लास पाण्यात टाका. त्यानंतर वीस मिनिटे हे पाणी चांगले उकळूद्या आणि प्या.
5 / 5
3 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 4 चमचे गुळाची पावडर, 3 चमचे ग्रीन टी, 1 चमचा मध, 2 चमचे आद्रक पावडर, 3 चमचे दालचिनी आणि 1 चमचे लिंबाचा रस लागणार आहे, वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर हे साहित्य तीन ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारण तीस मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवा. थोडे थंड झाल्यावर लगेचच प्या.