वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही खास पेय वजन लवकर कमी करू शकतात. ही पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. चरबी लगेचच बर्न होण्यास मदत होईल.
पोटाच्या सर्व समस्या आणि चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी खूप उपयुक्त आहे. पचनशक्ती वाढण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे ओवा एक ग्लास पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते प्यायल्यास चरबी कमी होण्यास मदत होते.
निरोगी शरीर राखण्यासाठी ग्रीन टीची महत्वाची भूमिका आहे. रोज सकाळी ग्रीन टी प्यायलो तरी वजन कमी होईल.यासाठीच दररोज ग्रीन टीचा आहारात समावेश करा.
बडीशेप भिजवलेले पाणी पोटाच्या सर्व समस्या आणि चरबी दूर करते. बडीशेप भिजवलेले पाणी प्यायल्यानेही शरीर थंड राहते. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे बडीशेप एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी गरम करून प्या.
कॉफीमुळे वजनही कमी होऊ शकते. आपण साखर आणि दुधाशिवाय ब्लॅक कॉफी पिणे आवश्यक आहे. तरच वजन कमी होईल. ब्लॅक कॉफी कॅलरी बर्न करते.