Heart Care : ‘हे’ स्पेशल चहा प्या आणि हृदयविकाराचा धोका कमी करा, वाचा अधिक!
आपल्यापैकी अनेकांना चहा प्यायला प्रचंड आवडतो. मात्र, चहामध्ये कॅफिन असल्याने हे कमी प्यावे असे सांगितले जाते. पण तज्ज्ञांचे मत आहे की, चहा योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कर्करोग आणि हृदयरोग टाळण्यास चहा मदत करतो.
1 / 5

2 / 5
तज्ज्ञांच्या मते, कॉफीच्या तुलनेत काळ्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज 2-3 कप काळा चहा पितात त्यांच्यामध्ये ट्रायग्लिसराइडची पातळी कमी असते. त्यांच्या कोलेस्टेरॉलची पातळीही सुधारते.
3 / 5
तज्ज्ञांच्या मते 3-4 कप ग्रीन टी दररोज घ्यावी. हे एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते, जे हृदयासाठी चांगले बनवते. त्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.
4 / 5
कॅमोमाइल टी एक हर्बल चहा आहे. जो हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. यामुळे हृदयरोग्यांना पुरेशी झोप आणि शरीर शांत होण्यास मदत होते. त्यामुळे तणाव कमी होतो.
5 / 5
पुदिन्यात असे अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही महत्त्वाचे आहेत. घश्यातील खवखवीपासून पुदन्याच्या चहाने नक्कीच आराम मिळू शकतो, पुदिन्यात अनेक आयुर्वेदीक गुणधर्म आढळतात. घशाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याचा चहा दिवसातून एकदा घ्यायला हवा.