Health | खसखस आणि मखाना मिसळून दूध प्या, हे आरोग्य फायदे नक्की मिळतील!
दुधामध्ये असलेले कॅल्शियम हाडांसाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही त्यात खसखस आणि मखाना मिक्स करून पिले तर त्याचे फायदे दुप्पट होतात. यामुळे आपले हाडे मजबूत होण्यास मदत होते. खसखस, मखाना आणि दूध हे तिन्ही उच्च प्रथिनांचे स्रोत आहेत. प्रथिने स्नायूंच्या निर्मितीसाठी उपयुक्त मानली जातात. जर तुम्ही वजन वाढवण्यासाठी व्यायाम करत असाल तर हे फायदेशीर आहे.