Health Care : दररोज सकाळी मुठभर सुकामेवा खा आणि आजारांना दूर ठेवा, वाचा अधिक!
सुकामेवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी एक मुठभर सुकामेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये देखील वापर केला जातो. या सर्व सुक्यामेव्याचे स्वतःचे गुणधर्म आहेत.
1 / 4

2 / 4
बाराही महिने सर्वच सुक्यामेव्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. मात्र, सुकामेवा थायरॉईड, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या आरोग्यासह कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यास मदत करते. यामुळे महागाची आैषधे खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर.
3 / 4
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कर्करोग टाळण्यासाठी आपण नेहमी आपल्या आहारामध्ये सुक्यामेव्याचा समावेश करावा. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील सुकामेवा फायदेशीर आहे.
4 / 4
काजू तांबे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी ओळखले जातात. तांबे आणि इतर एन्झाईम्स सोबत कोलेजन तयार करतात. जे त्वचेची लवचिकता वाढवण्यास मदत करतात. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)