Health | उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ फळांचे सेवन नक्की करा!
कलिंगड हे चवदार फळ आहे. कलिंगड हे अतिशय आरोग्यदायी आहे, त्यात पाण्यासोबतच जीवनसत्त्व A आणि C असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.
1 / 5
उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्णतेमुळे खूप थकवा आणि सुस्तपणा येतो. या ऋतूत उष्माघात टाळण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा आणि स्वत:ला ऊर्जावान ठेवा, निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. आहारात पाणीयुक्त फळांचा समावेश करा. ही फळे आपल्याला निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत करतील.
2 / 5
कलिंगड हे चवदार फळ आहे. कलिंगड हे अतिशय आरोग्यदायी आहे, त्यात पाण्यासोबतच जीवनसत्त्व A आणि C असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.
3 / 5
आंब्यामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात फायबर असते. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यात भरपूर पोटॅशियम सोबत जीवनसत्त्व ए आणि सी असते, ते अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते. यामुळेच या हंगामामध्ये आंब्याचा आपल्या आहारामध्ये समावेस करा.
4 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात शरीर निरोगी ठेवण्यासाठी खरबूजचा आहारामध्ये समावेश करा. आपण खरबूजच्या रसाचे देखील सेवन करू शकतो. दुपारच्या गरमीमध्ये खरबूजचे नक्कीच सेवन करा.
5 / 5
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण नारळ पाण्याचे देखील सेवन करायला हवे. कारण उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करणे चांगले असते. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.