पूर्वीच्या काळी काळे मिरे औषधी बनवण्यासाठी वापरले जायचे. फुशारकी, अपचन आणि छातीत जळजळ या समस्या दूर करण्यासाठी काळी मिरे फायदेशीर आहे. तसेच हृदय समस्या, कर्करोग, संधिवात, दमा, मधुमेह यासह अनेक रोग बरे यामुळे बरे होण्यास मदत होते.
प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यातही काळ्या मिऱ्याची भूमिका आहे. कारण काळ्या मिऱ्यामध्ये त्याचे घटक मोठ्या प्रमाणात सापडतात.
रक्तातील बीटा कॅरोटीनची पातळी वाढवण्यातही मिऱ्याची भूमिका असते. ज्या लोकांना वारंवार थंडी वाजते किंवा वारंवार शिंका येते, त्यांनी दिवसातून काही मिरी चघळल्यास त्यांना फायदा होतो.
मिरे पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून पिल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये आपण मिरे पावडरचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
काळे मिरे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, कोणत्याही गोष्टीचे प्रमाणात सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे काळ्या मिऱ्यांचे देखील अतिसेवन करू नका(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)