तुपातील हेल्दी फॅट्स शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. हे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. असे म्हणतात की तूप खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण चांगले होते. यामुळेच हंगाम कोणतेही असो आपल्या दररोजच्या आहारामध्ये तुपाचा नक्कीच समावेश करा.
उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी होण्याची समस्या निर्माण होते. कारण या काळात जास्त घाम येतो. नियमित तुपाचे सेवन केल्यास डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. तुम्हाला हवे असल्यास तूप लावून त्वचा हायड्रेट ठेवता येते.
जेव्हा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. तेंव्हा आपल्याला अनेक आजारांची लागण होते. मग अशावेळी आपण आहारामध्ये तूप नेहमीच घेतले पाहिजे. तूपामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
आयुर्वेदात असे सांगितले आहे की तूप सेवन केल्याने आपली पचनक्रिया चांगली राहते. उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुपापासून बनवलेल्या गोष्टी रोज खाव्यात. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
तूप हाडांसाठीही फायदेशीर मानले जाते. हाडांसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन K2 तुपात उपलब्ध आहे. हे शरीरात कॅल्शियम पोहोचवण्याचे काम करते. त्यामुळे याच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)