Makhana health benefits: सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर!
मखाना हे अशा ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे, जे आरोग्यदायी तसेच चवदार आहे. मखानामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. इतकेच नव्हेतर मखाना आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्यात दूध आणि ओट्स किंवा सॅलडमध्ये मखाना घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.