Health | लाल पोहे शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी, जाणून घ्या या सुपरफूडचे फायदे!
इतकेच नाही तर लाल पोह्यातील गुणधर्मांमुळे त्वचेचे रक्ताभिसरण चांगले होते आणि चांगली चमक येते. लाल पोह्यांमध्ये काही भाज्या घालूनही तुम्ही त्वचा निरोगी करू शकता. रक्तातील साखरेची पातळी कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
1 / 10
प्रत्येकाला पोहे खायला प्रचंड आवडतात. पोहे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, शिवाय पोह्यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यासही मदत होते. पोह्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात.
2 / 10
विशेष म्हणजे सकाळच्या गडबडीत पोहे अत्यंत कमी वेळेमध्ये तयार करतात येतात. शिवाय ते तयार करायलाही सोपे असतात. यामुळे बऱ्याच घरांमध्ये नाश्त्यामध्ये पोहेच असतात.
3 / 10
तांदळापासून बनवलेले पोहे भारतातील अनेक भागांमध्ये मोठ्या आवडीने खाल्ले जातात. मात्र, आपण सर्वजण पांढऱ्या रंगाचेच पोहे खातो.
4 / 10
आपल्या आरोग्यासाठी पांढऱ्या पोह्यापेक्षाही लाल पोहे फायदेशीर ठरतात. विशेष म्हणजे तयार करण्याची त्याचीही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात.
5 / 10
लाल पोह्यात फायबर, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, जस्त आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते. आम्ही तुम्हाला लाल पोह्यांचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
6 / 10
लाल पोह्याला सुपरफूड म्हटले जाते, कारण त्यात अनेक पौष्टिक घटक असतात तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. योग्य प्रमाणात फायबर असल्याने ते पोट निरोगी ठेवते.
7 / 10
जर तुम्ही ते नाश्त्यात खाल्ले तर तुम्ही दिवसभरात जास्त वेळ अन्न आणि साखरेची लालसा टाळू शकता. लाल तांदळापासून बनवलेल्या लाल पोह्यांमध्ये असे अनेक अँटीऑक्सिडंट असतात, जे हानिकारक फ्री रॅडिकल्स काढून टाकतात.
8 / 10
इतकेच नाही तर लाल पोह्यातील गुणधर्मांमुळे त्वचेचे रक्ताभिसरण चांगले होते आणि चांगली चमक येते. लाल पोह्यांमध्ये काही भाज्या घालूनही तुम्ही त्वचा निरोगी करू शकता.
9 / 10
रक्तातील साखरेची पातळी कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
10 / 10
लाल पोहे खाऊन रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवू शकता. एक प्रकारचे धान्य असल्याने त्यात निरोगी कर्बोदके असतात, जे शरीराला एलआयसी ऊर्जा देण्याचे काम करतात.