Health Care Tips | वाचा भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरतात!
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात. ते थेट खाणे पोटासाठी हानिकारक ठरू शकते. काही ड्रायफ्रुट्स भिजवलेले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. बदाम हे नेहमीच भिजवून खाणे फायदेशीर ठरते. त्याचा प्रभाव गरम असतो आणि ते थेट खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. बदामाच्या त्वचेमध्ये टॅनिन असते, जे पचण्यास कठीण असते.