अंजीर आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. परंतु जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर तुम्ही अंजीर खाणे टाळाच. याच्या सेवनामुळे पोटदुखी, गॅस, पोट फुगणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
अंजीराचा प्रभाव अतिशय उष्ण मानला जातो. याचे जास्त सेवन केल्यास रेटिनल रक्तस्राव होऊ शकतो. यामुळे जास्त प्रमाणात अंजीर खाणे टाळा.
ज्यांना मायग्रेनची समस्या आहे. त्यांच्यासाठीही अंजीर हानिकारक ठरू शकते. वाळलेल्या अंजीरमध्ये जास्त प्रमाणात सल्फाइट असते आणि सल्फाईटमुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते.
अंजीरमुळे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. अंजीरमध्ये भरपूर ऑक्सलेट आढळते. जे शरीरात उपस्थित कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करते.
ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे. त्यांनीही अंजीर खाऊ नये. अंजीरमध्ये असलेले ऑक्सलेट त्यांच्यासाठी समस्या वाढवू शकते.