Health | सोशल मीडियापासून सुरक्षित अंतर ठेवा, मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल!
सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.
1 / 5
बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःला वेळ न दिल्याने अनेक आजार आणि शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
2 / 5
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांचा ट्रेंड इतका वाढला आहे की आज ते लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. सकाळी उठल्याबरोबर लोक प्रथम फोनमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घातलात. तेच पूर्वीच्या काळी लोक झोपेतून उठल्यावर व्यायाम आणि योगा यांना प्राधान्य देत होते.
3 / 5
सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.
4 / 5
संशोधकांच्या मते, सोशल मीडियाचा वापर करणे मनोरंजक असू शकते. मात्र, त्याच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे. यामुळे बहुतेक लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. यामुळेच सोशल मीडियाचा अतिरेक वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
5 / 5
संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, सोशल मीडियावरून आठवडाभर ब्रेक घेतल्यावर मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांपासून दूर झाल्या.