Skin Care : अननसाने घ्या केस आणि त्वचेची काळजी, असा बनवा नैसर्गिक फेसपॅक…
त्वचा चमकदार करण्यासाठी तुम्ही अननस आणि बेसनाचा पॅक बनवू शकता. अननसाचा लगदा किसून घ्या आणि त्यात एक चमचा बेसन घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवा. याच्या मदतीने चेहऱ्यावर ग्लो येतो. आजकाल लोकांना चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडण्याची किंवा फ्रिकल्सची समस्या भेडसावत आहे. ते काढण्यासाठी किसलेल्या अननसात तीन ते चार चमचे दूध घाला.