Skin care : उन्हाळ्यात सकाळी त्वचेची काळजी घ्या आणि तजेलदार त्वचा मिळवा!
उन्हाळ्यात त्वचेवर साचणाऱ्या तेलामुळे पिंपल्सची समस्या अधिक होते. बेडशीटवर बसलेली धूळ रात्री चेहऱ्यावर जमते आणि सकाळी ती साफ करावी. सकाळी फेसवॉश किंवा क्लिन्जरने चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. सकाळी उठल्यानंतर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनर लावा. तज्ज्ञांच्या मते, ते त्वचेची पीएच पातळी संतुलित करते. यासाठी तुम्ही नेहमी अल्कोहोल फ्री टोनर वापरावे.