Health care : निद्रानाश होतो आहे? मग या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा आणि निवांत झोपा!
निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी योग्य वेळी झोपणे महत्त्वाचे आहे. वेळेवर झोपण्याचा प्रयत्न न केल्यास निद्रानाशाची समस्या होऊ शकते. झोपताना मोबाईल, आयपॅड वगैरे वापरू नका. दुधात ट्रिप्टोफॅन असते, जे झोप वाढवण्यास मदत करते. चांगली झोप येण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्या.