Health care tips : साखरेची लालसा नियंत्रित करण्यासाठी ‘या’ महत्वाच्या टिप्स फाॅलो करा आणि निरोगी राहा!
नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपण अनेक संकल्प करतो. त्यामध्ये विशेष करून वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागते. मात्र, अनेक उपाय करूनही हे पदार्थ खाणे आपण टाळू शकत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते.
1 / 5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपण अनेक संकल्प करतो. त्यामध्ये विशेष करून वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागते. मात्र, अनेक उपाय करूनही हे पदार्थ खाणे आपण टाळू शकत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या फाॅलो करून तुम्ही साखरेच्या लालसेवर नियंत्रण मिळवू शकता.
2 / 5
अनेकांना डाएटिंग करताना फक्त फळे खायला आवडतात. पण असे केल्याने त्यांना भूक लागते. अनेक वेळा भुकेवर नियंत्रण राहत नाही आणि मिठाईचे सेवन केले जाते. जर आपल्याही असे होत असेल तर आपण त्यावेळी काजू खाल्ल्ये पाहिजेत. त्यामुळे पोट भरलेले राहते आणि साखरेची तल्लफ कमी होते.
3 / 5
जेव्हा तुम्हाला गोड खावेसे वाटेल, तेंव्हा पाणी प्या. त्यामुळे त्या काळात पोट भरेल आणि साखरेची तल्लफही राहणार नाही. पाणी पिणे हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
4 / 5
तज्ज्ञांच्या मते, जर झोप पुरेशी घेतली नाही तर जास्त खाण्याची इच्छा होते. म्हणूनच दिवसभरात 6 ते 8 तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीरासाठी इतरही अनेक फायदे होतात.
5 / 5
बऱ्याच वेळा साखरेची तल्लफ पूर्ण झाली नाही तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामुळे नेहमीच पोट भरलेले ठेवा. जेणेकरून तुम्हाला साखरेची लालसा होणार नाही.